मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग आणि विशेष मुलांसोबत साजरा केलाआपला वाढदिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिव्यांग आणि विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ आणि पुस्तके वाटप करण्यात आली. स्वयम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयम् अॅपचे अनावरण, स्वयम् च्या ‘झेप’ या स्मरणिकेचे आणि संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयम् अॅपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी दिव्यांगांसाठी आयोजीत विशेष प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी स्वयम् च्या संस्थापक निता देवळालकर उपस्थित होत्या. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या शुभेच्छांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकार केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading