मोलकरणीने चोरलेले सोन्याचे दागीने आणि रोकड २४ तासाच्या आत हस्तगत करण्यात चितळसर पोलिसांना यश

मोलकरणीने चोरलेले सोन्याचे दागीने आणि रोकड २४ तासाच्या आत हस्तगत करण्यात चितळसर पोलिसांना यश आलं आहे. मानपाडा येथील मेपल इमारतीत राहणाऱ्या प्रियंका प्रसाद आणि त्यांचे कुटुंबीय दोन दिवस जर्मनीला गेले होते. मात्र त्याच वेळेत त्यांचे सासू-सासरे आणि आई-वडिल घरीच होते. जर्मनीहुन परत आल्यानंतर त्यांच्या आईच्या मोबाईलवरुन आलेल्या संदेशाद्वारे त्यांच्या ए टी एम मधुन १० हजार काढल्याचे त्यांना समजले. त्याच प्रमाणे घरातील काही दागिने गायब झाल्याचेही समजले. त्यांनी पोलिसांकडे या प्रकरणी मोलकरणीच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी कौशल्याने तपास करुन या मोलकरणी कडुन चोरीस गेलेली रोकड तसेच १८ ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण १ लाख १२ हजारांचा ऐवज हस्तगत केला अशी माहीती पोलिसांतर्फे देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading