करिअर निवडताना, वाचन, अभिव्यक्ती आणि विचारांचे प्रोसेसिंग करुन मनाचा कल ओळखणे गरजेचे – भूषण गगराणी

करिअर निवडताना, वाचन, अभिव्यक्ती आणि विचारांचे प्रोसेसिंग करुन मनाचा कल ओळखणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्र्यांचे अव्वर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, गुरुवर्य आनंद दिघे व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर हे अध्यक्षस्थानी होते. सोशल मिडियामुळे विचार आणि विकास क्षमतेवर परिणाम झालेला आहे. विचार करण्याची भाषा विकसित करायल हवी. भाषा सक्षम हवी, अभिव्यक्त होता यायला हवे. ज्ञान भाषा आणि मातृभाषा यावर प्रभुत्व हवे. १० टक्के मेरीट आणि ९० टक्के ॲप्लिकेशन हा बॅलन्स जमायला हवा. यासाठी ॲटिट्युड टेस्टची मदत घ्यायला हवी. मित्रमैत्रिणीने करिअर निवडले म्हणून तेच करिअर निवडू नये. अभिव्यक्ती आणि विचारांचे प्रोसेसिंग करुन मनाचा कल ओळखून करिअरची निवड करा, असे बहुमोल मार्गदर्शन भूषण गगराणी यांनी केले. करिअर हे साधन नसून साध्य आहे, हे लक्षात ठेवून करिअर निवडायला हवे. ज्या कारणासाठी करिअर निवडायचे आहे ते कारण कळायवा हवे, शासकीय सेवेत येण्याचे कारण काय ? उद्देश काय ? हे कायम लक्षात ठेवायला हवे. करिअर निवडताना विचारवंतांचा सल्ला घेणे, चुका न करता व्यवस्थित नियोजन कसे करावे याकडे लक्ष द्यायला हवे. पालकांनी, कुटूंबाने पाल्याच्या मागे खंबीरपणे उभे रहायला हवे, पाल्यांनीही अल्पसंतुष्ट, आत्मसंतुष्ट न राहता पुढे कोणती क्षेत्रे निवडायची आहेत, हे कळणेही महत्वाचे असल्याची माहिती भूषण गगराणी यांनी दिली. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, १० वी आणि युपीएससी प्रमाणेच १२ वी ची परिक्षाही महत्वाची आहे. सिव्हिल सर्विसचा अभ्यास करताना सर्वच परिक्षा सिरियस घ्यायला हव्यात. करिअर निवडताना आनंदी आयुष्य, दिशा स्पष्ट आणि कशासाठी, कोणासाठी काम करायचे आहे, हे कळायला हवे, यासाठी सर्वांगीण वाचन करायला हवे, तर करिअर मध्ये नक्किच यश मिळेल, अशी ग्वाही अभिजित बांगर यांनी दिली. गुरुवर्य आनंद दिघे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचा राजकारणाबरोबरच सर्वच क्षेत्रात वावर होता. साहित्यिक, खेळाडू, विश्लेषक यांच्याशी त्यांचे घनिष्ट नाते होते. ठाणे शहरात पूर्वी अनेक व्याख्यानमाला व्हायच्या, आताही होत आहेत. मात्र आनंद दिघे यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरु व्हावी अशी आमची इच्छा होती. तिची पूर्तता आता आम्ही करत आहोत,अशी माहिती प्राध्यापक. प्रदिप ढवळ यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading