मुक्ती बाईक चॅलेंज राईडचा अभिनय कट्ट्यावर समारोप

लहान मुलांचे आणि महिलांचे समाजात होणारे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण या विषयांवर जनजागृती करणाऱ्या ओएसीस इंडिया आयोजित मुक्ती बाईक चॅलेंज २०२२ या राईडचा शनिवारी समारोप करण्यात आला. यात मुंबई आणि दिल्लीबरोबर युकेचे रायडर्सदेखील सहभागी झाले होते. अभिनय कट्टा आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने या बाईक रायडर्सचा प्रमाणपत्र आणि तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. अभिनय कट्ट्यावर हा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. २८ ऑक्टोबर रोजी मुक्ती बाईक चॅलेंज या राईडला बँग्लोर येथून सुरूवात झाली होती. हजारो किमीचा प्रवास करुन हे बाईक रायडर्स शनिवारी ठाण्यात दाखल झाले. या राईडचे हे सहावे वर्षे असून यात एकूण १२ रायडर्स सहभागी होते. त्यात युकेचे दोन रायडर्स. दिल्लीचा एक आणि मुंबईचे १० असे १२ रायडर्स सहभागी होते. संतोषी अम्प्पाया, श्रद्धा शेळके, जेसीका गुंजल, संतोष नाडार, सुदेश राजगुरू, अँड्रयु मॅथसन, जेम्स गुंजल, विजय अंपाय्या, डॅमियन पायने, जॉन लाल, मायकल अल्मेडा, मोजेस कोट्रीके, सपोर्टींग टीमध्ये मर्सी जेनिफर, विश्वास उदगीरकर, डॅनियल जबाराज या रायडर्सचा सहभाग होता. होस्माने, हासन, पूत्तूर,मंगलोर,कुमठा, बेळगाव, मिरज,कराड, पुणे आणि ठाणे असा हा प्रवास होता. या मार्गावर सादर करण्यात आलेल्या पथनाट्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रायडर्सचा सत्कार अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती, कट्ट्याचे कलाकार आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रायडर्सने त्यांचे अनुभव कथन केले. ज्या उद्देशासाठी ही राईड केली त्या राईडला दिलेले मुक्ती बाईक चॅलेंज राईड हे नाव अत्यंत समर्पक आहे. मानवता धर्म जपण्याचे काम ओएसीस इंडियासारखी संस्था करीत आहे. विकृत मानसीकतेला ठेचायचे असेल तर अशा संस्थांची गरज आहे. या सर्व रायडर्सने एक इतिहास घडविला आहे अशा भावना नाकती यांनी व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading