अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या मोहिमेत २९ कोटी रूपयांचे आयातीत अन्न पदार्थ जप्त करण्यात आले. आयात केलेल्या खाद्य पदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा म्हणून ही विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तुर्भे येथील टीटीसी इंडस्ट्रीयल इथे अचानक धाड टाकून कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पेढ्यांचे स्वरूप कोल्ड स्टोरेज असून या पेढ्यांमध्ये बाहेरील देशातून आयात केलेल्या अन्न पदार्थांचा साठा आढळला. या ठिकाणी २९ लाखांहून अधिक किंमतीचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे.