धुळे येथे झालेल्या ४९ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर आणि कॅडेट ज्यूदो निवड चाचणी स्पर्धेत ठाण्याच्या श्रद्धा गिरी हिने (-६३) किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. धुळे येथे ४,५,६ नोव्हेंबरला ही स्पर्धा झाली. त्यामध्ये रत्नागिरी आणि जळगाव येथील प्रतिस्पर्धींना तिने हरवले. श्रद्धा ही ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुलात राजपूत सरांच्या मार्गदर्शनाखाली जुदो चा सराव करीत आहे.