मुंब्रा पोलिस ठाण्यातील पोलीस शिपायाने कोरोनावर मात केली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अनेक पोलीसांना कोरोनाची लागण झाली होती. पोलीस शिपाई शैलेश भोसले हेही मुंब्रा पोलीस ठाण्यातच वर्दीवर असून त्यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली मात्र त्यानंतर पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी पुन्हा कोरोनाची चाचणी केली. त्यावेळी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कळव्यातील सफायर रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काही दिवस उपचार घेतल्यानंतर ते यातून बाहेर पडले आणि कोरोनामुक्त झाले. त्यांना काल रूग्णालयातून घरी सोडण्यात आले तेव्हा ते राहत असलेल्या कोपरीतील त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.