ठाणे महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण ३४ नवीन कोरोनाबाधित रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण ३४ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण रूग्णांची संख्या ३४४ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ रूग्ण वागळे इस्टेट प्रभाग समितीतील असून ९ रूग्ण लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती, ४ नौपाडा-कोपरी आणि मुंब्र्यामध्ये प्रत्येकी ३, माजिवडा-मानपाडा, उथळसर, दिवा आणि कळव्यामध्ये प्रत्येकी १ रूग्ण सापडला आहे.
आज एकूण १० जण बरे होऊन घरी गेले तर एकाचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading