मुंबई आणि ठाणे परिसरात सोनसाखळी चोरणा-या गुन्हेगारास अटक

मुंबई आणि ठाणे परिसरात सोनसाखळी चोरणा-या गुन्हेगारास गुन्हे शाखेनं अटक केली आहे. सलमान उर्फ राजकुमार इराणी यास कल्याण भास्कर शाळेजवळ वरिष्ठ पोलीस निरिक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अटक केली. इराणी या चैन आणि मंगळसूत्र खेचणाऱ्या आरोपीला शीताफीने पकडून त्याच्या कडून ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने आणि एक मोटारसायकल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सलमान इराणी याने आतापर्यंत कापुरबावडी, नौपाडा, कळवा पोलीस स्टेशन हद्दीत त्याच्या साथीदारासह चैन स्नॅचिंगचे आठ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच इराणी टोळीच्या सह आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading