जिल्ह्यात आज कोरोनाचे १७३ नवीन रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १७३ नवीन रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ३८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात आज ७९ नवीन रूग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. सध्या ५२४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये १० नवीन रूग्ण तर ५९ रूग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईमध्ये ५९ नवीन रूग्ण तर २९६ रूग्ण उपचाराधीन आहेत. उल्हासनगर मध्ये ७ नवे रूग्ण तर २७ रूग्ण उपचार घेत आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात ३ रूग्ण आढळले तर १३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मीरा-भाईंदर मध्ये १२ नवे रूग्ण आढळले तर ८४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये एकही रूग्ण नाही तर ११ रूग्ण उपचाराधीन असून ठाणे ग्रामीण मध्ये ३ नवे रूग्ण आढळले तर ४४ रूग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading