मुंबईप्रमाणेच ठाण्यातील गच्चींवरील वेदरशेडला मंजुरी देण्याची मुख्य सचिवांकडे मागणी

मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्यातही गच्चींवरील वेदर शेडला मान्यता मिळावी अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे. मुंबई महापालिकेनं गच्चींवरील वेदर शेडला मान्यता दिली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गच्चीवरील वेदर शेडला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यातही आला आहे. पण अद्यापही या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळं सामाजिक हितास्तव गच्चींवरील वेदर शेडला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी मागणी राजीव दत्ता यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading