समूह विकास योजनेसंदर्भातील खर्चास मंजुरी न देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध तपासणी करण्याकरिता खाजगी ठेकेदारांना काम देण्याच्या सुमारे साडेसहा कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देऊ नये अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं सर्वपक्षीय नगरसेवकांना केली आहे. उद्याच्या सर्वसाधारण सभेत समूह विकास योजनेतील लाभार्थी ठरवणं, चटईक्षेत्राची मोजणी करणं, सोयीसुविधा सर्वेक्षण, कायदेशीर बाबींची तपासणी करण्याचं काम क्रिसिल आणि टेक कॉम या कंपनीस दिलं जाणार असून यासाठी साडेसहा कोटींचा खर्च आहे. उद्याच्या सर्वसाधारण सभेत याबाबतच्या प्रस्तावास मंजुरीसाठी ठेवण्यात आलं आहे. त्यास मंजुरी देऊ नये यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानानं सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना साकडं घातलं आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना एकूणच या योजनेबाबत सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading