मालमत्ता, पाणी पुरवठा कर न भरणाऱ्यांवर धडक कारवाई – ८४ दुकाने सील तर ९२ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित

प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून दिवा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. दिव्यातील कर न भरणारी ८४ दुकाने आणि १० निवासी खोल्या सील करण्यात आल्या असून ९२ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मालमत्ता आणि पाणी कर वसुलीकरिता प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्ठे देण्यात आली आहेत. दिवा प्रभाग समितीमध्ये कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर वसुलीकरिता धडक मोहिम हाती घेण्यात आली असून दिव्यातील थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या चार दिवासांपासून दिव्यामधील कर न भरणारी दुकाने सील करण्यात आली असून सर्व थकबाकीधारकांना डिमांड नोटीस बजाविण्यात येत आहेत. तसेच पाणीपुरवठा कर न भरणाऱ्या थकबाकीधारकांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. दिनांक १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत दिव्यातील ८४ दुकाने आणि १० निवासी खोल्या सील करण्यात आल्या आहेत. ३७९ थकबाकीधारकांना डिमांड नोटीस बजाविण्यात आलेली असून ९२ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading