मालमत्ता, पाणीपट्टी थकबाकीदारांवर कडक कारवाईस सुरूवात

ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले असून वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षअखेरीस ज्या मिळकतधारकांनी मालमत्ता कराची थकीत आणि चालू रक्कम अद्यापही महापालिकेस भरलेली नाही अशा मिळकतधारकांच्या मिळकतीवर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये सॅम्युल नाडर यांची फरसाण फॅक्टरी, जितेंद्र पाटील यांचे पाच अनिवासी गाळे, महावीर कल्पवृक्ष या मिळकतीची २६ लाख थकबाकी असल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या तसेच आर मॉलचा १ कोटी ३८ लाखांचा मालमत्ता कर थकीत असल्याने या मॉलचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला असून आर मॉलला वॉरंट जप्तीची नोटीस बजविण्यात आली आहे. प्रभाग समितीमधील ब्लॉक क्र. १०५ मधील चार मिळकतींची मालमत्ता कराची थकीत रक्कम असल्याने या मिळकतींचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता परंतु लिलाव प्रक्रियेपुर्वीच संबंधीत चारही थकबाकीधारकांनी कराची संपूर्ण रक्कम महापालिकेस जमा केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading