मालमत्ता कर न भरल्यामुळे मुंब्र्यातील महावितरणच्या कार्यालयाला महापालिकेकडून सील

बील न भरल्यास इतरांची वीज कापणा-या महावितरणच्या कार्यालयाला ठाणे महापालिकेनं सील ठोकलं आहे. मुंब्र्यातील मेक कंपनीजवळील महावितरणच्या कार्यालयाला महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीनं काल मालमत्ता कर न भरल्यामुळे सील ठोकलं. महापालिका आयुक्तांनी मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी जोर लावला असून डिसेंबर अखेर ५०० कोटींच्या वसुलीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यामुळं मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेनं जोरदार मोहिम हाती घेतली असून साडेचार लाखांचा मालमत्ता कर न भरल्यामुळे महावितरणच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आलं. महापालिकेनं कर भरण्याची नोटीस महावितरणला दिली होती. पण नोटीस देऊनही कर न भरल्याने महापालिकेनं महावितरणच्या सर्व कर्मचारी वर्गाला बाहेर काढून कार्यालयाला सील ठोकलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading