मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या वतीनं जिल्हा शासकीय रूग्णालयाला सकस खाद्यान्न सामुग्री

मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या वतीनं कोरोना रुग्णांच्या चांगल्या प्रकारे उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाला सकस खाद्यान्न सामुग्री प्रदान करण्यात आली. मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या अध्यक्षा सुमन अग्रवाल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल रुग्णांकरिता सकस खाद्यान्न सामुग्री प्रदान करण्यात आली. या खाद्यान्न सामुग्रीमध्ये रवा, मैदा, साखर, शुद्ध तूप, शेवया, गुळ, साबण, मिनरल वाटर आदी वस्तूंचा समावेश होता. जिल्हा शासकीय रूग्णालयात मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार वाईट हाल सुरू आहेत. गोरगरिब-गरजूंच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवी सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. अशा संघटनांमध्ये मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर संस्थेसह मारवाडी समाजातील अनेक संघटनांचा समावेश आहे. मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विविध भागांतील झोपडपट्टया आणि चाळींमध्ये राहणाऱ्या गोरगरिब-गरजू मजुरांना सातत्याने खाद्यान्नाचं वाटप करण्यात येत आहे. कोरोनाच्या विरुद्धातील लढाईत विजयश्री संपादित करावयाची आहे आणि आपण सगळे मिळून हे नक्कीच करून दाखवू असा विश्वास सुमन अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading