चारचाकी वाहनाची धडक बसुन रुग्णवाहिका थेट सिग्नलच्या खांबावर आदळून अपघात

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर तुरळक वाहने असतानाही ठाण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. भरधाव चारचाकी वाहनाची धडक बसुन रुग्णवाहिका थेट सिग्नलच्या खांबावर आदळल्याची घटना ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे काल दुपारी घडली. ही रुग्णवाहिका कल्याणहुन मुंबईच्या दिशेने एका रुग्णाला घेऊन जात असताना हा अपघात झाला. रुग्णवाहिकाही भरधाव वेगात असल्याने सिग्नल जंप करताना वर्तकनगरच्या दिशेने येणाऱ्या अन्य चारचाकी वाहनाची रुग्णवाहिकेला धडक बसली.त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटुन रूग्णवाहिका थेट सिग्नलच्या खांबाला धडकली. या अपघातात सुदैवाने जिवितहानी टळली असली तरी, रुग्णवाहिकेतील रुग्णाच्या सोबत असलेल्या एका महिलेला किरकोळ दुखापत झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading