माणसांप्रमाणेच विविध नक्षत्रातील पावसालाही नावं

नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं पण पावसालाही नावं देण्यात आली आहेत. पुनर्वसु नक्षत्रात पडणा-या पावसाला शेतकरी तरणा पाऊस म्हणतात. सध्या मुसंडी मारत पडणारा जोरदार पाऊस पाहता तो आपले नाव सार्थ करत आहे असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. पुष्य नक्षत्रात म्हणजे २० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान पडणा-या पावसाला म्हातारा पाऊस म्हणतात. आश्लेषात म्हणजे ३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान पडणा-या पावसाला आसळकाचा पाऊस, मघा नक्षत्रात म्हणजे १७ ते ३० ऑगस्ट दरम्यान पडणा-या पावसाला सासूंचा पाऊस, पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात म्हणजे ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान पडणा-या पावसाला सूनांचा पाऊस, उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात म्हणजे १३ ते २६ सप्टेंबर दरम्यान पडणा-या पावसाला रब्बीचा पाऊस तर हस्त नक्षत्रात म्हणजे २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान पडणा-या पावसाला हत्तीचा पाऊस म्हटले जाते असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading