कर्करोग रूग्णालयाचं भूमीपूजन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता

मुंबईतील टाटा स्मृती कर्करोग रूग्णालयाच्या मदतीनं घोडबंदर रस्त्यावरील कासारवडवली येथे कर्करोग रूग्णालय उभारलं जाणार असून याबाबत महापालिका आयुक्तांच्या दालनात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत कासारवडवली येथील नियोजित कर्करोग रूग्णालयासाठी जागा हस्तांतरीत करणं, रूग्णालयाचा प्राथमिक आराखडा तयार करणं तसंच इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे रूग्णालयाचा भूमीपूजन सोहळा येत्या ऑगस्टमध्ये करण्याचंही निश्चित करण्यात आलं. कर्करोग रूग्णालय ही काळाची गरज असून हे रूग्णालय मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येत असल्यानं त्याचा फायदा जवळपासच्या नागरिकांना होऊ शकतो. त्यामुळं रूग्णालयाला मान्यता मिळण्यास कोणताही अडथळा येणार नाही असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या रूग्णालयास शासनाकडून निधी उपलब्ध होईपर्यंत महापालिकेतर्फे आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तरतूद महापालिकेतर्फे करण्याचं आश्वासन महापालिका आयुक्तांनी यावेळी दिलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading