माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार राजाराम तवटे, ठाणे तहसीलदार युवराज बांगर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.