केंद्र सरकारच्या ऑथेन्टीकेशन अॅपमुळे निवृत्ती धारकांना दिलासा

केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी फेस ऑथेंटिकेशन अॅप्लिकेशनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने एक मोबाइल अॅप लाँच केले आहे, या अॅपद्वारे पेन्शनधारकांना त्यांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पाठवता येईल. या अॅपचा प्रचार करण्यासाठी शासनाने देशव्यापी मोहीम सुरू केली असून स्टेट बँकेची अंबरनाथ शाखा डी एल सी – एफ ए कॅम्पचे उद्घाटन करणारी पहिली शाखा ठरली आहे. या शाखेत पेन्शनधारकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेत १८० पेन्शनधारकांनी डीएलसी-एफ ए मोबाईल अॅपद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र पाठवले. या कार्यक्रमात पेन्शन कर्जाचे १८ प्रस्ताव प्राप्त झाले, त्यापैकी २ प्रस्तावांना त्याच दिवशी मंजुरी देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading