महिलांच्या डब्यावर झालेल्या दगडफेकीमुळं एक महिला जखमी

रेल्वेनं प्रवास करताना महिला डब्यात शिरून चोरी करणं, छेडछाड करणं असे प्रकार नित्याचे झाले असतानाच काल महिलांच्या डब्यावर दगडफेक झाल्यानं एक महिला जखमी झाली. काल रात्री ९ च्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकाच्या दरम्यान महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात जड वस्तू फेकल्यानं कांचल हटले ही महिला जखमी झाली. कांचन हटले ही दिव्याची रहिवासी असून ती एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर काम करते. नेहमीप्रमाणे काम संपवून घरी जात असताना डब्यावर फेकलेल्या जड वस्तूमुळे कांचन जखमी झाली. तिचे दात तुटले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला वर्गामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथे यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र यावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळं असे प्रकार वारंवार घडत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. जखमी झालेल्या कांचन हटलेवर डोंबिवलीच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर लोहमार्ग पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading