महाविकास आघाडीचे गठन झाले तेव्हाच पॉवर हंग्री जिहाद दिसल्याचा आशिष शेलारांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीचे गठन झाले तेव्हाच  पॉवर हंग्री जिहाद दिसुन आला.असा गौप्यस्फोट करून भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी या सत्ताभुकेल्या जिहादींना धडा शिकवण्यासाठी सजग राहा. असे आवाहन जनतेला केले. वंदे मातरम संघ आणि दीनदयाळ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने धर्मांतराचे वास्तव आणि समान नागरी कायदा या विषयावर एक विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केरळच्या ओ. श्रुती यांनी लिहिलेल्या रिव्हर्जन या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन शेलार यांच्या हस्ते झाले. ओ.श्रुती यांनी धर्मांतरणाबाबत मांडलेल्या आपबीतीतुन समाजासमोर प्रश्न ठेवुन विचार करायला लावल्याचे शेलार यांनी नमुद केले. केवळ धर्मांतरण नाही तर हे हिंदु आणि राष्ट्र यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारणतः लव्ह जिहाद, ईलेक्ट्रॉनिक जिहाद, सर्व्हीस जिहाद आणि पॉवर हंग्री जिहाद या चार प्रकारे सुरु असलेला जिहाद शेलार यांनी सोदाहरण स्पष्ट केला. आज हा पॉवर जिहाद गंभीर वळणावर आहे, घरात शिरून जिहाद केला जातोय तेव्हा सजग राहुन या सत्ताभुकेल्या जिहादींना धडा शिकवण्याचे आवाहन आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ विधिज्ञ अंजली हेळेकर यांनी समान नागरी कायद्यावर बोलताना, १९५१ साली एका खटल्यात समान नागरी कायद्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यानंतर, अनेकदा विविध प्रकरणातुन तसेच खटल्यांच्या निर्णयावरून महिला आणि पुरुषांना समानतेची वागणुक तसेच समान नागरी कायद्याची आवश्यक्ता असल्याचे तज्ञानी सांगितल्याचे नमुद केले. केरळ येथील विशाली शेट्टी ज्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारून आता केरळ येथे मुली आणि महिलांचे समुपदेशन करत आहेत. त्यानी आपला अनुभव सांगताना, आयटी क्षेत्रात काम करीत असताना मुस्लीम सहकारी हिंदु धर्मात असे का .. तसे का ? असे प्रश्न विचारून भंडावुन सोडत, मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करून इस्लामची थोरवी बिंबवण्याचा प्रयत्न करीत. यातुन ब्रेन वॉश करून धर्मांतरण केले. अखेर नोकरी सोडुन सनातन धर्माचे आचरण करणाऱ्या आशा विद्या समाजम संस्थेसाठी झोकुन दिले असुन याद्वारे हिंदु समाजाला जागे करण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. पेशाने शिक्षिका असलेल्या रिव्हर्जन या पुस्तकाच्या लेखिका ओ.श्रुती यांनी, भाषेची अडचण असतानाही हिंदी भाषेत संवाद साधला. आर्थिक गुंतवणुक करून केरला स्टोरीच्या माध्यमातुन धर्मांतराचा हा गंभीर विषय समाजासमोर मांडल्याबदल निर्माते आणि दिग्दशकाचे आभार व्यक्त करून धर्मांतरण नव्हे तर या मतमतांरणात कुटुंबाला आई – वडीलाना दोषी न धरता या सिस्टीमला दोषी मानत असल्याचे नमुद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading