चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या यूपीएससी पूर्व परीक्षेच्या सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या यूपीएससी पूर्व परीक्षेच्या सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत युपीएससीची पूर्वपरीक्षा 28 मे रोजी होणार असून या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत सराव परीक्षा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या संस्थेमार्फत एकूण 36 सराव परीक्षा सत्र आयोजित करण्यात आली असून सराव परीक्षेतील प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मूल्यांकन केले जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महापालिका ही एकमेव महापालिका आहे. 25 मे पर्यंत एकूण 36 सराव परीक्षा सत्राचे आणि सराव परीक्षेतील प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मूल्यांकन करणेबाबतचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading