ठाण्यात झालेल्या पावसामुळे पाचपाखाडी परिसरात झाड पडल्यामुळं तीन दुचाकींचं नुकसान झालं आहे. ठाणे महापालिकेच्या मागच्या बाजूला असलेल्या मिलिंद मिरा सोसायटीच्या आवारात आज एक झाड पडलं. यामध्ये मनिषा गायकवाड यांच्या होंडा ॲक्टीव्हा, सुभाष चव्हाण यांच्या होंडा स्प्लेंडर आणि आणखी एका होंडा ॲक्टीव्हा गाडीचं नुकसान झालं आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.