महापालिकेची सर्व प्रभाग समिती आणि उपप्रभाग समिती कार्यालयं ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

मालमत्ता कर नागरिकांना वेळेवर भरता यावा यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती आणि उपप्रभाग समिती कार्यालयं ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. मालमत्ता कर वसुलीचा इष्टांक ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी आणि ठाणेकरांना मुदतीत कर भरता यावा याकरिता ही कर संकलन केंद्र ३१ मार्च पर्यंत दुसरा आणि चौथा शनिवार सकाळी साडेदहा ते पाच तसंच रविवारी साडेदहा ते दीड या वेळेत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावरही मालमत्ता कर भरता येणार असून डीजी ठाणे या ॲपवरही कर जमा करण्याची अतिरिक्त सुविधा देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading