राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं २५ जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं २५ जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दहाव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगानं महिला, युवक, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सेनादलातील मतदार, अनिवासी भारतीय तसंच समाजातील दुर्लक्षित घटक यांना विचारात घेऊन जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चुनाव पाठशाला राष्ट्रीय दिवसाच्या पूर्वतयारीच्या कामासाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करणार असून जिल्ह्याच्या १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे. सैन्यदलातील मतदारांसाठी १५ जानेवारी या आर्मी दिनाचं औचित्य साधून सर्व्हीस व्होटर्समध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना ८व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या वेळेस करण्यात आली असून ते राष्ट्रीय मतदार दिवसाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading