कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर

कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 17 मार्च रोजी महापालिका प्रशासनाने 159 सफाई कामगारांच्या बदल्या केल्याचे आदेश काढले होते. मात्र या बदल्यांच्या यादीमध्ये दोन मयत तर आठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला. सामाजिक कार्यकर्तां कडून पालिकेची चूक लक्षात आणून देताचं खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तत्काळ दुसरी यादी जाहीर केली. याबाबत महापालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी चूक लक्षात आल्यानंतर ही यादी वितरित केली नाही तर तत्काळ दुसरी ऑर्डर काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिल आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading