महापालिकेकडून नव्या दीड हजाराहून अधिक मालमत्तांचा शोध

कोरोना काळात झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी महापालिकेनं कर वसुलीवर भर दिला आहे. याकरिता ज्या बांधकामांना आत्तापर्यंत मालमत्ता कर लागला नव्हता अशा दीड हजाराहून अधिक मालमत्ता महापालिकेनं शोधल्या आहेत. महापालिकेनं अलिकडेच राबवलेल्या कर वसुली मोहिमेत ३२२ कोटी रूपयांहून अधिक मालमत्ता कर वसूल झाला होता. महापालिका आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीचं ६०० कोटींचं उद्दिष्ट दिलं आहे. त्यामुळं महापालिकेनं मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याची मोहिम सुरू केली आहे. आत्तापर्यंत मालमत्ता धारक कर भरण्यासाठी महापालिकेकडे जात होते मात्र आता महापालिका मालमत्ता धारकांकडे कर वसुलीसाठी जात आहे. कर भरणा न करणा-यांवर जप्तीची नोटीस बजावली जाणार असून अशा थकबाकीदारांची यादीही वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्दीस दिली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading