महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा

महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा आणि शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण व्हावी किंबहुना आपल्या शाळेची इमारत ही सुस्थितीत असावी आणि शिक्षण घेताना त्यांना आनंद मिळावा यासाठी महापालिकेच्या नादुरूस्त शाळा सुस्थितीत असाव्यात याकामी इमारत दुरूस्ती अंतर्गत 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शाळा दुरूस्तीच्या कामाचा कार्यादेश निघाल्यानंतर इमारतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्‌त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार काही शाळांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, ज्या शाळांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत किंवा काही शाळांची कामे धीम्या गतीने सुरू आहेत अशा संबंधित कार्यकारी अभियंत्यांना यांनी नोटीस बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत नोटीसाचा खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. शाळांच्या दुरूस्तीचा कार्यादेश मार्च 2023 मध्ये देण्यात येऊनही दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने संबंधित कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले. प्रत्येक प्रभाग समिती हद्दीतील शाळांच्या दुरूस्तीचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यापैकी फक्त 5 शाळांच्या दुरूस्तीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. तर 9 शाळांच्या दुरूस्तीचे काम 50 टक्क्यापेक्षा जास्त झाले असून ती कामे प्रगतीपथावर आहे. मात्र 8 शाळांच्या दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू असून सदरची कामे अत्यंत असमाधानकारक आहेत. तर 12 शाळांच्या दुरूस्तीच्या कामाची सुरूवात झालेली नाही. वागळे विभागातील ठामपा शाळा क्र. 23 चे 40 टक्के, कळवा विभागातील शाळा क्र. 129, 69, 70, 115, 29 या शाळांचे 30 टक्के, माजिवडा मानपाडा शाळा क्र. 53, 54 आणि लोकमान्य सावरकनगर विभागातील शाळा 46 चे 25 टक्के, वर्तकनगर विभागातील शाळा क्र. 65 व मुंब्रा विभागातील शाळा क्र. 75, 118 चे 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. कळवा विभागातील शाळा क्र. 4,6,72,68, माजिवडा मानपाडा विभागातील शाळा क्र. 59,52,128, मुंब्रा विभागातील शाळा क्र. 78,123,113,77,124,116, दिवा विभागातील शाळा क्र. 85,90,91 तर नौपाडा विभागातील शाळा क्र.16 या शाळांच्या कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. या शाळांच्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असून अपूर्ण असलेल्या कामांबाबतचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. याबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशा सूचना कार्यकारी अभियंत्यांना दिल्या असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading