धर्मवीर आनंद दिघेच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अभिवादन

धर्मवीर आनंद दिघेच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अभिवादन करण्यात आलं. धर्मवीर आनंद दिघेच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने चरई येथे एकत्र जमून धर्मवीर आनंद दिघेयांच्या स्मारकास अभिवादन करून टेंबीनाक्यावरील पुतळ्यास आणि शक्ती स्थळावरील त्यांच्या समाधीस्थळास अभिवादन करण्यासाठी असंख्य निष्ठावंत शिवसैनिक जमले होते.“अमर रहे… अमर रहे…. दिघे साहेब अमर रहे.. !”, “जबतक सुरज चांद रहेगा.. दिघे साहब का नाम रहेगा !” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला होता. खासदार राजन विचारेंपासून विविध पक्षातील मंडळींनी यावेळी आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाधी स्थळावर येऊन दिघे यांच्या प्रति आदरांजली व्यक्त केली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading