महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम युध्द पातळीवर

संततधार पडणा-या पावसानं उसंत दिल्यानंतर महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम युध्द पातळीवर सुरू झालं आहे. महापालिका आयुक्तांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून खड्डे बुजवण्याचं काम युध्द पातळीवर करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीमुळे शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पातलीपाडा, आनंदनगर बस डेपो, होरायझन शाळा, लालानी रेसिडेन्सी, ब्रह्मांड, एअरफोर्स स्टेशन, कोलशेत, ढोकाळी, मुलुंड चेकनाका अशा विविध ठिकाणची पाहणी केली आणि आवश्यकता वाटल्यास मनुष्यबळ तसंच यंत्रसामुग्री वाढवण्याच्या सूचनाही दिल्या. ब्रह्मांड ते गायमुख या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांची पाहणी करून सेवा रस्त्यांवरील खड्डे तसंच दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील उड्डाण पूलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करून त्यांनी महामंडळाच्या उपअभियंत्यांना उड्डाण पूलावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading