जलवाहिनीसाठी खणताना महानगर गॅसच्या वाहिनीला धक्का लागून गॅस वाहिनीतून गळती – गॅस पुरवठा ठप्प

ठाण्यातील काही भागाचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. आज ११ च्या सुमारास जलवाहिनी दुरूस्तीचं काम सुरू असताना महानगर गॅस वाहिनीला धक्का लागल्यामुळे त्यातून गॅसची गळती सुरू झाली. पूर्व द्रूतगती महामार्गावरील उड्डाण पूलाजवळ असलेल्या सेवा रस्त्यावर हा प्रकार घडला. याची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गॅसचा पुरवठा बंद केला. आता गॅस वाहिनीच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. यामुळं आजूबाजूच्या परिसरातील सुमारे ५ हजार गॅस धारकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. गॅस वाहिनीची दुरूस्ती पूर्ण करण्यास ३ ते ४ तास लागणार असल्यामुळं गॅस पुरवठा संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत होईल असं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading