महापालिका क्षेत्रातील नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे महापालिकेनेही नर्सरी पासून बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे जिल्ह्यामध्ये गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दिलेल्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी नर्सरी पासून ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता पाहता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सर्व प्रकारच्या शाळा व्यवस्थापनांनी सुट्टीचा आदेश जाहीर करावे असे म्हटले आहे शाळा व्यवस्थापन सुट्टी जारी न केल्यास एखाद्या दुर्घटनेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर राहील अशाही सांगण्यात आल आहे

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading