ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 213 मिलिमीटर पाऊस – सर्वत्र पाणीच पाणी

ठाण्यामध्ये गेले दोन दिवस जोरदार पाऊस होत असून गेल्या 24 तासात 213 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे ठाण्यामध्ये मंगळवारी ही 90 मोठा पाऊस झाला त्यानंतर कालपासून पाऊस जोरदार सुरू आहे गेल्या 24 तासात 213 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे या जोरदार पावसामुळे सखलभागात पाणी साठ्ण्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक ठिकाणी झाडं पडणे तसेच घरांवरचे पत्रे उडणे असे प्रकार घडले आहेत सुदैवाने अशा प्रकारांमध्ये जीवित हानी झालेली नाही या जोरदार पावसामुळे ठाण्यातील प्रसिद्ध असा उपवन तलावही भरून वाहू लागला आहे पण तलावातील पाणी रस्त्यावर आल्याचे दिसत आहे शहरामध्ये नेहमी पाणी साठणाऱ्या जागांमध्ये पाणी साचला आहे आज शाळांना सुट्टी असल्यामुळे रस्त्यावर फारशी वाहतूक कोंडी दिसत नाही मात्र पाणीच पाणी दिसत आहे पावसाबरोबरच जोरदार वारा वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत विद्या प्रसारक मंडळाच्या विज्ञान महाविद्यालयात एक झाड विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीवर पडलं होतं सुदैवानं यामध्ये कोणतीच हानी झाली नाही

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading