महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची आयुक्तांकडून पाहणी

महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्या तात्काळ खाली करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. महापालिका आयुक्तांनी काल एका बैठकीत प्रत्येक प्रभागातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्या तात्काळ खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व सहाय्यक आयुक्तांनी आज सकाळपासून आपल्या प्रभागातील धोकादायक इमारतींची आणि इतर गोष्टींची पाहणी केली. काल झालेल्या अधिका-यांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी सर्व अधिका-यांना आपापल्या प्रभाग समितीअंतर्गत धोकादायक इमारतींची पाहणी करणं, झाडं पडणं, दरड कोसळणं, चेंबर कव्हर तुटणं आदींची पाहणी करून त्याबाबत तात्काळ पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व सहाय्यक आयुक्तांनी अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची पाहणी केली. कालपासून पडत असलेल्या संततधारेमुळं झाडं पडणं, नाल्याच्या भिंती पडणं, डोंगराळ भागातील घरांना इजा पोहचली का, दरड कोसळली का याची पाहणी करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading