ठाणे शहरात पावसानं पार केला ३ हजार मिलीमीटरचा टप्पा

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही पावसानं ३ हजार मिलीमीटरची मर्यादा ओलांडली आहे. ठाण्यामध्ये गेली १० वर्ष काही अपवाद वगळता ३ हजार मिलीमीटरहून अधिक पाऊस होत आहे. २०११ मध्ये ३ हजार ५६०, २०१२ मध्ये २ हजार ६८९, २०१३ मध्ये ३ हजार ४६२, २०१४ मध्ये २ हजार ६३५, २०१५ मध्ये २ हजार २२५, २०१६ मध्ये ३ हजार ३९०, २०१७ मध्ये ३ हजार ६४०, २०१८ मध्ये ३ हजार २४५, २०१९ मध्ये ४ हजार ५६९ तर यावर्षी आजपर्यंत ३ हजार ५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले दोन दिवस पावसानं संततधार धरली असून आज दुपारी साडेअकरा ते साडेबारा या तासाभरात २० मिलीमीटर पाऊस झाला त्यावेळी पावसानं ३ हजार मिलीमीटरची मर्यादा ओलांडली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading