ठाणे महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू होणार असल्यामुळे वेतन वाढ होणार असून यामुळे महापालिकेवर 114 कोटींचा बोजा पडणार आहे. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यास शासनाने दीड वर्षांपूर्वीच मंजुरी दिली आहे. येणाऱ्या महासभेत सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी देण्याचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास महापालिका कर्मचाऱ्यांच्या पगार साधारणता पंधरा टक्क्यांनी वाढ होणार आहे या वेतनवाढीचा लाभ सुमारे साडेदहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे.