नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी नाट्यगृह भाड्यात सवलत

सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून ठाण्यातील नाट्यगृहांमध्ये सादर होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाच्या मुळ भाड्याच्या केवळ 25 टक्के भाडे आकारण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने यापुर्वीच घेतला असून नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी हा निर्णय लागू असल्याने प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात विपरीत परिणाम झाला आहे, याचा फटका सर्वच कलाप्रकारांना बसला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या संस्थांवर अनेक लोक अवलंबून असतात. या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापौरांनी नाट्यगृहाच्या मुळ भाड्याच्या २५ टक्के भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय हा केवळ नाटकांसाठी मर्यादित नसून मराठी वाद्यवृंद, लोककला आणि इतर सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लागू असल्याने नाट्यगृह व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी करावी असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading