माजिवडा पूलावर बस दुभाजकावर आदळल्यानं वाहतूक कोंडी

माजिवडा पूलावर आज दुपारी राज्य परिवहन महामंडळाची एक बस दुभाजकावर आदळल्यानं काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. विवियाना समोरील उड्डाणपूलावर दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. राज्य परिवहन मंडळाची ही बस पूलावर चढत असताना बहुधा ब्रेक निकामी झाल्यामुळे पूलाच्या कठड्याला धडकली आणि आडवी झाली. त्याचवेळी वेगाने एक टॅक्सी त्या रस्त्यावरून जात होती. बस आडवी झाल्यामुळे ही टॅक्सी त्या बसच्या मागच्या भागाला धडकली आणि पूलावरील संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळं काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन ही बस रस्त्याच्या कडेला आणून ठेवली आणि वाहतूक पूर्ववत केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading