ठाण्यात दीड दिवसांच्या एकूण ११ हजार ६०२ गणपतींचं विसर्जन

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात काल ठाण्यात दीड दिवसांच्या एकूण ११ हजार ६०२ गणपतींचं विसर्जन झालं. ठाणे महापालिकेनं पर्यावरणभिमुख गणेशोत्सव विसर्जन व्यवस्था उभारली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मोठे विसर्जन घाट, कृत्रिम तलाव, मूर्ती स्वीकार केंद्र अशा माध्यमातून हे विसर्जन करण्यात आलं. ठाण्यात काल दीड दिवसांचे ११ हजार २७८ घरगुती गणपतींचं विसर्जन झालं. तर कोलशेत घाट येथे ५ आणि रेवाळे तलाव येथे ३ दीड दिवसांच्या अशा एकूण ८ सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. तर महापालिकेनं विविध ठिकाणी उभारलेल्या मूर्ती केंद्रांवर ३१६ गणेश मूर्ती स्वीकारण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading