महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डोळखांब शासकीय आश्रमशाळेत कार्यक्रम संपन्न

समाज कल्याण विभाग ठाणे तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रमानिमित्त तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डोळखांब येथील न्यू इंग्लिश स्कूल तसेच शासकीय आश्रमशाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रमाचे औचित्यसाधून शासकीय आश्रमशाळा डोळखांब येथे वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता आठवी – नववीतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
तसेच न्यू इंग्लिश स्कूल डोळखांब येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading