बिबळ्याचे कातडे विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

बिबळ्याचे कातडे विक्रीसाठी आलेल्या दोघांना रामनगर पोलीसांनी सापळा रचून अटक केली. धुळे आणि नंदुरबारवरून दोघेजण बिबळ्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती डोंबिवली पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रामनगर पोलीसांनी डोंबिवली पूर्व येथील ९०फूट रस्त्याजवळ बिबळ्याची कातडी घेऊन आलेल्या जयंतीलाल साळी आणि दिनेश जागरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आधी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलीसांनी अधिक तपास केला असता त्यांच्याकडे बिबळ्याचे कातडे सापडले. त्यानंतर पोलीसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून बिबळ्याचे कातडे हस्तगत केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading