महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त शहरात कुष्ठरोग, क्षयरोग आणि असांसर्गिक आजार शोधमोहिम जागरूकता अभियान

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त शहरात कुष्ठरोग, क्षयरोग आणि असांसर्गिक आजार शोधमोहिम जागरूकता अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य स्वयंसेवकांमार्फत शहरात घरभेटी देऊन ६ लाख लोकसंख्येवरील आजाराकरिता शोध तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. या अभियानांतर्गत १४ दिवसांच्या कालावधीत दीड लाख घरांमध्ये सर्व्हे केला जाणार आहे. या आजारांबाबत जनजागृती करून संशयित योग्य रूग्णाची तपासणी आणि उपचार महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात येणार आहेत. या मोहिमेत सर्वेक्षणासाठी येणा-यांना सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading