गुन्हे शाखेनं अलिबाग पोलीसांबरोबर केलेल्या संयुक्त कारवाईत २ पुरातन मूर्ती सापडल्या

ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अलिबाग पोलीसांसह केलेल्या संयुक्त कारवाईत २ जुन्या पुरातन मूर्ती जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेचं एक पथक नौपाडा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्या प्रकरणात तपास करत असताना अलिबाग येथे पोहचलं. या प्रकरणात आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, २ पुरातन अनमोल मूर्ती विकण्यासाठी काही व्यक्ती सारळ पूल, गोकुळ ढाबा अलिबाग येथे येणार आहेत. त्यावेळी अलिबाग पोलीसांच्या सहाय्यानं सापळा रचून माहितीप्रमाणे एका पांढ-या रंगाच्या इनोव्हा गाडीतून आलेल्या ३ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या गाडीत तपासणी केली असता त्यांच्याकडे १२ मुखी भगवान विष्णूची ८ किलो ७०० ग्रॅम वजनाची आणि ६ किलो ८२७ वजनाची लक्ष्मीची आणखी एक पुरातन मूर्ती मिळाली. हे तिघेजण मूर्तीबद्दल काही बोलत नसल्यानं गुन्हे शाखेनं संयुक्तपणे कारवाई करून या मूर्ती जप्त केल्या आहेत. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading