मनोरमानगर भागातील शिवसेना शाखेवरून शिंदे-ठाकरे गट एकमेकांसमोर ठाकले उभे

ठाण्यातील मनोरमा नगर भागात असलेल्या शिवसेना शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गट काल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या शाखेवर बॅनर लावण्यावरून हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या शाखेमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी बसले असताना काही महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांनी शाखेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि शाखेवर लावण्यात आलेला शिंदे गटाचा बॅनर उतरवून ठाकरे गटाचा बॅनर लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. खासदार राजन विचारे आणि शिवसेना गटाचे नरेश म्हस्के हे यावेळी उपस्थित होते. पोलीसांनी धाव घेऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि शाखेला कुलूप लावले. शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये शिवसेना शाखा, आनंद दिघे वाचनालय, त्यावर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो होता. तर ठाकरे गटाच्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो वगळून बाळासाहेब ठाकरे , आनंद दिघे यांचा फोटो होता. शिवसेनेतील पदाधिका-यांवर जाणूनबुजून कारवाई केली जात असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी यावेळी बोलताना केला. तर शाखा बळकावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वत:च्या कष्टाने जागा घेऊन शाखा बांधा असा सल्ला नरेश म्हस्के यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading