मतदान करण्यासाठी मतदारांकडे छायाचित्र ओळखपत्र आवश्यक

जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या ३ मतदारसंघांसाठी येत्या सोमवारी मतदान होत असून मतदान करण्यासाठी मतदारांकडे छायाचित्र ओळखपत्र आवश्यक असून ते नसल्यास इतर ११ दस्तऐवज ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. मतदाराकडे मतदार छायाचित्र असलेले ओळखपत्र नसल्यास पासपोर्ट, वाहन परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन दस्तऐवज आणि आधारकार्ड हे ओळख म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. तर या मतदानाची मतमोजणी २३ मे ला होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल, कावेसर इथे होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व इथे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी महावीर फौंडेशनचे रेसिडेन्शियल स्कूल, एलकुंडे इथे होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading