मतदान आणि मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था

जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या तीन जागांसाठी येत्या सोमवारी मतदान होत असून हे मतदान निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलीसांनी २ हजार २६६ तर ठाणे ग्रामीण पोलीसांनी १ हजार ७१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ठाणे शहर पोलीसांच्या हद्दीत ४ हजार २३९ मतदान केंद्रं आहेत. यातील ३९९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. मतदान सुरक्षित पार पडावं यासाठी ११ हजार २७८ पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये १० उपायुक्त १४ सहाय्यक पोलीस आयुक्त, ९३ पोलीस निरिक्षक, ३६१ पोलीस निरिक्षक, ६ हजार पोलीस कॉन्स्टेबल, साडेतीन हजार होमगार्डस्, राज्य राखीव पोलीस दलाच्या ५ कंपन्या, अर्धसैनिक दलाच्या ६ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत १ हजार ५१७ मतदान केंद्र आहेत. यासाठी १ हजार ६०८ पोलीस कर्मचारी, १६८ पोलीस अधिकारी, जिल्ह्याबाहेरील ७०० पोलीस कर्मचारी आणि ५० पोलीस अधिका-यांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव दलाच्या ३ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading