भिवंडी उपजिल्हा रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

भिवंडी उपजिल्हा रूग्णालय म्हणजे इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयाची इमारत ३० वर्ष जुनी असून या इमारतीची दुरूस्ती करणं आवश्यक आहे. इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयाच्या बांधकाम आणि विस्तारीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी दिला जातो. पण हा निधी इमारतीच्या दुरूस्तीसाठी वापरण्यास परवानगी नसल्यामुळं इमारत दुरूस्तीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या रूग्णालयाच्या संपूर्ण इमारतीचं विद्युतीकरण करणं, डबल फिडरची सुविधा देणे, नव्याने उद्वाहन बसवणे, शवागराच्या वातानुकुलित यंत्रणेचं नुतनीकरण करणं आवश्यक असून यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. हा निधी तात्काळ उपलब्ध करून घेण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयाच्या इमारतीची जागा ही महापालिकेतर्फे आरोग्य विभागाला भाडेतत्वावर देण्यात आली आहे. या रूग्णालयाचं संपूर्ण कामकाज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत सुरू आहे. या रूग्णालयाचं हस्तांतरण सार्वजनिक आरोग्य विभागाकडे होणं आवश्यक असून ते तातडीनं करून घ्यावे अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading