भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान – शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसला बाय बाय

भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान सुरू असून राहुल गांधींना बाय बाय करून आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बी.के.भगत यांचे सुपूत्र अनिल भगत यांनी मुंब्रा, रेतीबंदर भागातील शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाणे जिल्ह्यात येत असताना काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद उफाळला होता. दुसरीकडे आता राहुल गांधीच्या आगमनाचा मुहूर्त साधून ठाणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने ठाण्यात उरली सुरली कॉंग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल भगत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी अनिल भगत यांच्यासह, कॉग्रेस शहर सरचिटणीस संजय शिंदे, प्रदेश काँग्रेस ओबीसी कोकण विभाग सरचिटणीस सुधीर जाब्रे, वार्ड अध्यक्ष सुशांत कांबळे, मनोज प्रजापती आर्दींसह शेकडो कार्यकर्त्यानी राहुल गांधींना अखेरचा टाटा करून कांग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी बोलतांना संजय केळकर यांनी अनिल भगत हे चळवळीतील नेते असून राहूल गांधी ठाण्यात असताना त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगितलं. पंतप्रधान मोदींचे काम बघून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आता भाजपमध्ये येत आहेत. एक प्रकारे केंद्र सरकारच्या कामाचीच ही पावती आहे. काँग्रेसने केवळ गरिबी हटावचा नारा दिला, पण मोदी सरकारने गरीब कल्याण योजना राबवुन गोरगरीबांना खऱ्या अर्थाने न्याय दिला असे केळकर यांनी सांगितले. दरम्यान सध्या कॉंग्रेस नेतृत्वहीन बनली असुन राहूल गांधी ठाण्यात असताना काँग्रेसवरील राग व्यक्त करण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे अनिल भगत यांनी स्पष्ट केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading